जेऊर – धायखिंडी (ता.करमाळा) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा च्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत धायखिंडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रम संस्कर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात *युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास* हे बिंद्र वाक्य घेऊन 3 जानेवारी ते 9 जानेवारी या दरम्यान श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या दरम्यान या गांवात 1000 पेक्षा जास्त वृक्षलागवड करण्यात येणार आहे तसेच जनावराचे लसीकरण, आरोग्य शिबीर, जलतारा प्रकल्प , धनकचरा व्यवस्थापन, गांडूळरवंत, परसबाग, सेंद्रिय शेती, जलव्यवस्थाप, भूमीपुत्राचा सन्मान सोहळा व हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. स्वच्छता अभियान ग्राम सर्वेक्षण अशा विविध व्याख्यानाच्या माध्यमातून ग्रामस्थाचे प्रबोधन केले जाणार आहे. सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन व प्रबोधन केले जाणार आहे.
या शिबिरामध्ये शासनाचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.या शिबिरामधून स्वंयमसेवक आणि ग्रामस्थ यांना वेगवेगळ्या व्याख्यानातून बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी संपूर्ण ग्रामस्थ सक्रिय सहभागी होणार आहेत .
सदर शिबार यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी संभाजी किर्दाक सर व राष्ट्रीय सेवा + 2 स्तरचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख ,प्रा. संजय पाटील, प्रा. मनोहर धिंदळे, प्रा. दिलीप थोरवे, प्रा.भाऊसाहेब फुके, प्रा.सौ.सुजाता भोरे कमिटी सर्व सदस्य व महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवक सज्ज झाले आहेत .


















