Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ.दिनेश अमळनेरकर हे ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ संस्थेच्या अध्यक्षपदी

तरुण भारतbyतरुण भारत
January 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – विज्ञान प्रसार आणि तंत्रज्ञान विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या व्यापक हेतूने १९७६ साली स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ वी संस्थेच्या अध्क्षपदी, मटेरियल सायन्स क्षेत्रतील विख्यात वैज्ञानिक डॉ.दिनेश पुंडलिक अमळनेरकर यांची निवड करण्यात आली आहे.डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ. होमी सेठना यांच्या सारख्या दिग्गज वैज्ञानिकांनी भूषवलेल्या अध्यक्षपदी डॉ.दिनेश अमळनेरकर यांची निवड सर्वानुमते एकमाने झाली असून विज्ञानक्षेत्रातील अनेकांनी या निवडीचे सार्थ निवड म्हणत डॉ अमळनेकर यांचे अभिनंदन केले आहे.


विशेष म्हणजे डॉ.दिनेश अमळनेरकर हे मूळचे पंढरपूरचे असून मटेरियल सायन्स क्षेत्रातील एक ख्यातनाम संशोधक आहेत. ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल’ या विषयातील एक जागतिक तज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सी-मेट ( सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी) या नामवंत संस्थेचे माजी महासंचालक म्हणून डॉ. अमळनेरकर यांचे योगदान विज्ञानक्षेत्रात सर्वश्रुत आहे.

दक्षिण कोरिया आणि जपान या दोन देशांच्या विद्यापीठांमध्ये डॉ.अमळनेरकर यांनी केलेले संशोधन कार्य आणि विज्ञानक्षेत्रात केलेले भरीव योगदान उल्लेखनीय असून त्यांना विज्ञान क्षेत्रातील अनेक नामवंत संस्था व विद्यापीठांनी विशेष पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे नुकतेच त्यांना गेली १०० वर्षे कार्यरत अशा नामवंत ‘इंडियन केमिकल सोसायटी’ च्या मद्रास येथे झालेल्या ६२ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘जीवन गौरव पुरस्कार २०२५  देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी आजवर विविध आंतरराष्ट्रीय विज्ञानविषयक नियतकालिकांतून २३० पेक्षा अधिक विषयावर संशोधनात्मक निबंध लिहिलेले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे डॉ.अमळनेरकर यांच्या नावावर २४ भारतीय आणि ३ अमेरिकेची पेटन्टस् आहेत.
डॉ.अमळनेरकर यांची ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे माजी अध्यक्ष डॉ.प्रा.जी.डी.यादव यांनी स्वागत केले असून डॉ.अमळनेकरांचे ज्ञान व अनुभव अॅकॅडमीच्या विज्ञान प्रसार कार्यात मोलाचे योगदान देईल असे म्हटले आहे.

ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ.विजय भटकर या दिग्गजांनी महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. अशा संस्थेच्या अध्यक्षपदाचा मान डॉ.अमळनेरकर यांच्या सारख्या उत्साही व विशेषदृष्टी असलेल्या वैज्ञानिकारा लाभलेला आहे. त्यामुळे यापुढे ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेन’च्या विज्ञान प्रसार व जनजागरण कार्यास अधिक गती लाभणार आहे. ही संस्था अधिक समाजाभिमुख होण्याची गरज असून डॉ. अमळनेरकर त्यात यशस्वी होतील अशी विज्ञानप्रेमींची अपेक्षा आहे.

Post Views: 98
Previous Post

सोलापूर मनपा निवडणूक प्रचार सभांसाठी १३ मैदानांसह ५८ चौक निश्चित

Next Post

सोलापूर शहरवासीयांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर शहरवासीयांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध 

ताज्या बातम्या

आता दिव्यांगांना ई बाइकची शक्ती

May 5, 2026

संतोष दाभाडे यांना राज्यस्तरीय सामाजिक सेवारत्न पुरस्कार २०२६ प्रदान

May 5, 2026

मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊनतर्फे दै तरुण भारतच्या पत्रकारांचा गौरव

May 5, 2026

भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

May 5, 2026

भाजपच्या विजयाचा हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

May 5, 2026

डंपर आणि बसचा भीषण अपघात दोघे जागीच ठार

May 5, 2026

लाईट बिल मागण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण

May 5, 2026

उष्णतेमुळे पेटला कचऱ्याचा डेपो

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847402

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697