शंकरनगर -अकलूज येथील विजय गणेशोत्सव सार्वजनिक ट्रस्टच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना द ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष विश्वतेजसिंह व त्यांच्या पत्नी शिवांशिका मोहिते – पाटील या उभयतांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी या ट्रस्टचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील , कार्याध्यक्ष माजी खासदार रणजितसिंह मोहिते -पाटील ,ट्रस्टचे सचिव राजेंद्र काकडे ,संचालक भीमराव काळे चंद्रकांत कुंभार , श्रीकांत राऊत व सहकार महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख कार्यकारी संचालक सुहास यादव संचालक मंडळातील सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते . अकलूज परिसरात लहान-मोठे शंभरावून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत सकाळपासूनच विविध मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती वाजत गाजत प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाताना चे चित्र दिसले लोकमान्य गणेशोत्सव मंडळ गांधी चौक येथे सदस्य अजित राखले यांच्या हस्ते प्रतिष्ठापना केली या मंडळाचे हे 51 वे वर्ष आहे विजय चौक येथील शिवरत्न गणेशोत्सव मंडळ या मंडळाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील असून या मंडळाचे 54 वे वर्ष आहे त्यांच्या हस्ते सायंकाळी प्राणप्रतिष्ठा झाली छत्रपती गणेशोत्सव मंडळ गोळीबार चौक या मंडळाचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील असून शुभम जठार यांच्या हस्ते पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली महात्मा फुले भाजी मंडई येथे मंदिरामध्येच गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले जुना गणपती बुर्जा गणपती विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मागे यांची श्री गणेशाची पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना झाली रात्री उशिरापर्यंत विविध मंडळे मिरवणुकीने गणेशाच्या मूर्ती घेऊन जाताना दिसत होते
Post Views: 10