सोलापूर – अखंड हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून संपूर्ण देशभर ओळखले जाणाऱ्या मानाचा श्री आजोबा गणपती च्या गणेशोत्सवा मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी आठ वाजल्यापासून आज गणपतीची स्थापित स्त्रीच्या मूर्तीस महारुद्र अभिषेक 108 दुर्वानामावली अथर्वशीर्ष पठण, होम करून प्रतिमात्मक गणपती म्हणून सुपारीची स्थापना श्रेष्ठ अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख मालक उपाध्यक्ष काका मेंडके यांच्या शुभहस्ते सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी मंगलमय वातावरणात करण्यात आहे त्यानंतर श्री ची महाआरती करून उपस्थित सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी सचिव अनिल सावंत, खजिनदार केदार वनारोटे, सहसचिव गंगाधर गवसने व ट्रस्टचे कार्यकरणी सदस्य गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टी अध्यक्ष आ. विजयकुमार देशमुख यांनी आजोबाच्या चरणी प्रार्थना केली की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस कमी पडला आहे. यामुळे शेती व्यवसाय व शेतकरी बांधव सध्या अनेक संकटांना तोंड देत आहेत. बळीराजा हा आपल्या जगाचा पोशिंदा आहे त्याची सुख समृद्धी आणि प्रगती हीच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती आहे. विघ्नहर्ता गणराया आपल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तम आरोग्य अफाट शक्ती द्यावी, भरपूर पाऊस पडू दे शेतात भरघोस पीक येऊ दे आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करावी अशी प्रार्थना करून सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सव व गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. पुजेचे व महाआरतीचे पौरोहित्य वेदमूर्ती रतिकांत स्वामी यांनी केले.




















