सोलापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा, तालुका सिंदखेड राजा या ठिकाणी भारत संग्रामच्या वतीने शिक्षक मारुती बेलभंडारे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण राज्यमंत्री रविकांत तुपकर, उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापुर जिल्ह्यातील शिक्षक मारुती बेलभंडारे यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पत्रकार सचिन खंडारे , निवड समितीचे मुख्य प्रमुख विकास सुखदाने , विशाल सुखदाने आदींनी परिश्रम घेतले.
—

























