माळशिरस – राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत गावातील मतदारांनी मताधिक्य देऊन सुद्धा गावातील विकास कामे झालेली नाहीत गावातील विकास खुंटलेला आहे गतिमान विकास करण्याकरता माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कामांवर विश्वास व भरवसा ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करीत असल्याचे पठाण वस्ती गावचे थेट जनतेतील लोक नियुक्त सरपंच एजाज पठाण यांनी भाजप पक्ष प्रवेश वेळी बोलताना सांगितले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत पठाण वस्ती येथील लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्यामध्ये एजाज पठाण सरपंच, अशोक सोनवणे माजी उपसरपंच, पितांबर मगर, लालासो मगर, शिवाजी शेटे ग्रामपंचायत सदस्य, दिलीप शेटे ग्रामपंचायत सदस्य, बापू कनप ग्रामपंचायत सदस्य, तनवीर पठाण चेअरमन विकास सेवा सोसायटी, इम्तियाज पठाण माजी उपसरपंच, सतीश सरतापे, सुनील सरतापे, जावेद पठाण, अलाउद्दीन सय्यद, भीमराव मगर, सोमनाथ गोरे, देवा कनप, अंजुम पठाण, अख्तर पठाण, मुश्ताक पठाण, नाना लोंढे, आबा कनप, अमोल शिंगाडे, जयराम शिंगाडे, महादेव शेटे (गुरूजी), अलिम पठाण, महादेव बापू सुळ, अनिल कनप. आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने आपल्या गावातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर आपण पक्षप्रवेश केलेला आहे सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील असे सांगून सर्वांचे भारतीय जनता पक्षामध्ये माजी आमदार राम सातपुते यांनी स्वागत केले..























