सोलापूर – प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिता सुनिल कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण रामय्या गुर्रम व विजय भुमय्या चिप्पा
यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी भव्य व प्रभावी कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात आले.
सोमवारी मल्लिकार्जुन नगर, भगवान नगर, कुंचीकोरवे नगर, जव्हार नगर, बापूजी नगर तसेच अशोक चौक परिसरातील विविध मंडळांच्या वतीने या कॉर्नर सभा पार पडल्या. या सभांमध्ये भाजपच्या विकासाभिमुख धोरणांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील नेतृत्वाच्या सुशासनाचा ठामपणे उल्लेख करण्यात आला.
प्रभागातील रखडलेल्या प्रश्नांना कायमस्वरूपी उत्तर देण्यासाठी भाजपचेच सक्षम व विश्वासार्ह नेतृत्व आवश्यक असल्याचे ठाम मत यावेळी व्यक्त करण्यात आले.पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रभागातील जनतेचा कौल भाजपच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
“सबका साथ, सबका विकास” या संकल्पनेवर विश्वास ठेवत प्रभाग क्र. १३ मध्ये परिवर्तन घडविण्याचा निर्धार या कॉर्नर सभांमधून व्यक्त झाला. यावेळी स्थानिक नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


















