सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ मध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला.
मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटपाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद चंदनशिवे, भाग्यश्री काळे, महादेवी रणदिवे व गणेश पुजारी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत तिळगुळ वाटप केले.आनंद चंदनशिवे यांच्यासह उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला.
प्रदेश उपाध्यक्ष तथा उमेदवार आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीत संवाद साधण्यात आला. वसंत विहार, गायत्री नगर, मडकी वस्ती, वारद फार्म हद्दवाढ परिसरासह बुधवार पेठेतील जय मल्हार चौक, साठे चाळ, नरवीर तानाजी चौक, पठाण चाळ, माशाळ वस्ती, गणेश नगर, लक्ष्मी नगर, गुलमोहर आदी भागांत घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. यावेळी महिला उमेदवारांनी महिला नागरिकांना हळद-कुंकू लावून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत प्रत्येक कुटुंबाला तिळगुळ वाटप केले.
.गेल्या आठ वर्षांत आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची दखल घेत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळातही चारही नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम चंदनशिवे, धम्मपाल मैदर्गिकर, भीमा इंगळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तांबे, उमर शेख, रवींद्र काळे, उमेश रणदिवे, हृदयनाथ मोकाशी, बलवीर तीर्थकर, बिभीषण बाकले, मनोज थोरात, सोमनाथ करंडे, मुकेश मोकाशे, किरण वाळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















