करकंब : जनसमर्थ कर्ज म्हणजे भारत सरकारच्या विविध क्रेडिट लिंक सरकारी योजनांसाठी उदाहरणार्थ शेती,शिक्षण,गृहनिर्माण, व्यवसाय यासाठी हे एक राष्ट्रीय डिजिटल पोर्टल आहे.जिथे नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकतात,पात्रता तपासू शकतात व कर्ज मंजुरीची प्रक्रिया ही सुलभ करू शकतात.त्यामुळे कर्जाची उपलब्धता आणि प्रक्रिया पारदर्शक बनते.या पोर्टलमुळे अर्जदारांना मुद्राकर्ज,प्रधानमंत्री सूर्यघर योजना व इतर अनेक सरकारी योजनांचा एकाच ठिकाणी लाभ घेता येतो.
कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू करण्यात आलेल्या या जनसमर्थ योजनेद्वारे रविंद्र बाळासाहेब माने सांगवी,विजय निवृत्ती लोंढे करकंब ता.पंढरपूर येथील शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज आपले सरकार सेवा केंद्र करकंबचे चालक समाधान सुरेश गुंड यांच्या केंद्रामधून केला होता.त्यांचे कर्जवाटप रविंद्र धुमाळ शाखाधिकारी भारतीय स्टेट बँक करकंब यांच्या हस्ते रविंद्र बाळासाहेब माने,विजय निवृत्ती लोंढे यांना करण्यात आले.
जनसमर्थ योजनेद्वारे कर्ज मंजूर व्हावे यासाठी भारतीय स्टेट बँक करकंब व आपले सरकार सेवा केंद्र करकंबचे चालक समाधान गुंड यांनी सहकार्य केले.त्यांनी केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल शेतकरी रविंद्र बाळासाहेब माने,विजय निवृत्ती लोंढे यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.





















