करमाळा – शहरातील सिद्धार्थ नगर भागात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. गटारी गाळ आणि घाणीने भरले असून सांड पाणी साचले आहे. या घाणीमुळे सिद्धार्थ नगर परिसरात दुर्गंधी पसरली असून डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गंभीर समस्येकडे करमाळा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाची मागणी नागरिकांनी केली आहे साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसर दुर्गंधमय झालाआहे आणि नागरिकांना, महिलांना व वृध्दांना ये-जा करण्यास प्रचंड त्रास होत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही तरी करमाळा मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून या अस्वच्छतेची समस्या तातडीने दूर करावी अशी नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे


















