Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

तरुण भारतbyतरुण भारत
August 7, 2026
in crime
0
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गोरगरीब नागरिकांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा अवैध साठा करुन तो विक्रीसाठी वाहतूक केला जात असल्याच्या संशयावरुन बार्शी तालुका पोलिसांनी महसूल व पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकासह फपाळवाडी शिवारात मोठी कारवाई केली. या कारवाईत १० हजार ६५० किलो गहू, ८ हजार ४५० किलो तांदूळ आणि २०० किलो उडीद, तसेच एक ट्रक व एक पिकअप असा एकूण ३१ लाख १५ हजार ९८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास तहसीलदार एफ‌.आर. शेख तसेच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, फपाळवाडी (ता. बार्शी) गावच्या शिवारात रेल्वे स्टेशनसमोर, अरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मांगडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशनच्या धान्याचा साठा करण्यात आला आहे. हा माल ट्रक व पिकअप वाहनामध्ये भरुन विक्रीसाठी नेण्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली.
सायंकाळी सुमारे ७.२० वाजता पथक घटनास्थळी पोहोचले असता पत्राशेडसमोर टाटा ट्रक क्रमांक एमएच ११ एम ६४९२ आणि महिंद्रा पिकअप क्रमांक एमएच १० ए क्यू ८११२ उभे असल्याचे आढळले. या वाहनांमध्ये पत्राशेडमधून गहू व तांदळाची पोती भरली जात होती. यावेळी धनाजी अर्जुन मांगडे, गजेंद्र अरुण मांगडे, ट्रक चालक चांगदेव पिराजी दळवी व क्लिनर गणेश श्रीहरी कदम हे तेथे आढळून आले.
पंचांच्या उपस्थितीत वाहनांची व पत्राशेडची पाहणी केली असता ट्रकमध्ये १९५ पोती गहू, तर पिकअपमध्ये १५ पोती गहू व ४९ पोती तांदूळ आढळले. पत्राशेडमध्ये १२० पोती तांदूळ, ३ पोती गहू, खराब गव्हाची ३ पोती व ४ पोती खराब उडीद आढळून आला. तसेच ‘Madhya Pradesh State Civil Supplies Corporation Ltd.’ असे छापलेले पोते आणि दोन खाकी रंगाची पोतीही आढळली.
सदर धान्याबाबत संबंधितांकडे पावत्या, परवाने अथवा अन्य कागदपत्रांची मागणी केली असता कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच धनाजी मांगडे यांनी पत्राशेड व शेतजमीन आपली असल्याचे सांगितल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
पंचनामा करुन १० हजार ६५० किलो गहू, ८ हजार ४५० किलो तांदूळ आणि २०० किलो उडीद, तसेच ट्रक व पिकअप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त धान्याची एकूण किंमत ७ लाख १५ हजार ९८१ रुपये, तर दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत अनुक्रमे १६ लाख व ८ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड यांच्या फिर्यादीवरुन धनाजी अर्जुन मांगडे, गजेंद्र अरुण मांगडे, चांगदेव पिराजी दळवी आणि गणेश श्रीहरी कदम यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले धान्य रेशनचे असल्याचा संशय असून, त्याचा नेमका स्रोत आणि तो कुठे विक्रीसाठी नेला जाणार होता, याबाबत पुढील तपास  पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप, तहसीलदार एफ. आर.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचूटे तसेच पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
Post Views: 9
Previous Post

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next Post

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

August 7, 2026
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

August 7, 2026

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

August 7, 2026

शिक्षणमहर्षी तात्यासाहेब कोठे जयंतीनिमित्त रंगला सर्जनशीलतेचा सोहळा

August 7, 2026
बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

August 7, 2026
पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

August 7, 2026
करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

August 7, 2026

तीर्थ येथे सापडला मेईदेव राजाचा शिलालेख

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033464

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!