मोडनिंब – येथील श्री उमा विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था बाळे यांचेवतीने आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हा गौरव मिळाल्याचे सहकारी, पालक व माजी विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
या पुरस्कारामुळे मोडनिंब परिसरासह उमा विद्यालयाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे. शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी प्राचार्य पाटील सर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

















