देगलूर : शहरातील बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटी, मोंढा देगलूर शाखेत मराठी पत्रकार दिनाचे औचित्य सांधून सामाजिक उपक्रम राबवीत विभागीय व्यवस्थापक प्रदिप सुर्यवंशी व शाखाधिकारी संजय घोंगडे यांनी दि.१३ जानेवारी रोजी मराठी भाषिक वृत्तपत्राच्या प्रमुख पत्रकारांचा सन्मान केला.
देगलूर येथील बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटी शाखेत दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजनात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन धर्माबाद विभागाचे व्यवस्थापक प्रदिप सुर्यवंशी यांनी बुलढाणा अर्बन सोसायटीच्या विविध सामाजिक उपक्रमाची व शेतकरी, विद्यार्थी योजनाची माहिती उपस्थित दिली.
निर्भीडपणे समाजातील अडचणी, अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध वाचा फोडून, समाजाचे प्रबोधन करणाऱ्या मराठी पत्रकारांचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने बाळशास्त्री जांभेकराणी पहिले मराठी दर्पण वर्तमानपत्र सुरु केले. त्यांचे स्मरण व्हावे राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो. त्यानुसार बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटी शाखा देगलूरच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक भाईजी, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर यांच्या आदेशानुसार तसेच सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या सूचनेनुसार धर्माबाद विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत देगलूर शहरातील प्रमुख पत्रकार बंधूचे शॉल-पुष्पहार, वहि-पेन दिनदर्शिका देऊन सन्मान केला आहे. यामध्ये पत्रकार अनिल कदम, नरहरी कोलगाने, रामचंद्र भंडरवार, शेख शब्बीर, सतिश पांडवे, संतोष बावगे, राजू ताटे, मुल्ला फजल, मिलिंद वाघमारे, भीमराव दिपके,देवेंद्र कांबळे, शेख असमल, दिगंबर जाधव, संतोष मनधरणे, सुल्तान पटेल, देशमुख, गुंगेवार व इतर पत्रकारांचे सन्मान केला. शाखा व्यवस्थापक संजय घोंगडे, विभागीय लेखापाल संतोष दरेगावे, व्यवस्थापक हनमंत होट्टे सहा. शाखा व्यवस्थापक दिनेश खुनेवाड,रोखपाल व्यंकटेश बामणे, शैलेंद्र भूताळे, योगेश बोरगे, सचिन राठोड, श्रीनिवास हेमके, नागेश इरलावर, महेश दोन्तीवार आदी उपस्थित होते.

























