अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे हे नगरसेवक म्हणुन पाचव्यांदा निवडून आले आहेत. यानिमित्ताने प्रशासकीय अधिकारी डॉ.दत्ता नवले यांनी येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी त्यांनी
अक्कलकोट सारख्या बहूभाषिक नगर परिषदेच्या निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून येऊन ऐतिहासिक विजय मिळविणे हे केवळ महेश मालक यांच्या व्यक्तिमत्त्वालाच शक्य आहे असे सांगून महेश मालक इंगळे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी
प्राचार्य डॉ.शंकर नवले, प्रा.सागर नवले, प्राध्यापक प्रकाश नवले, सिंहगड पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य प्रा.सचिन चव्हाण,
शकील नाईकवाडी, ओंकार महाडीक, दर्शन घाटगे, सचिन हन्नूरे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, महेश मस्कले, लखन सुरवसे, विपुल जाधव आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – महेश मालक इंगळे यांचा सत्कार करताना प्रशासकीय अधिकारी डॉ.दत्ता नवले, शकील नाईकवाडी व अन्य दिसत आहेत.


















