माळशिरस – विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूल, ‘आनंदी बाजार’ हा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
या आनंदी बाजाराचे उद्घाटन श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका अनिषा कुलकर्णी व मानसी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संचालक संतोष कुलकर्णी, संचालक धनंजय मस्के, इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. इनामदार मॅडम, समीर गांधी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गेजगे सर, गोपाळराव देव प्रशालेचे मुख्याध्यापक. केसकर, आनंदी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सुमारे ७० ते ८० स्टॉल्स उभारले होते.
यामध्ये पालेभाज्या, ताजी फळे, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शालेय साहित्य तसेच खवय्यांसाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजवले होते. या बाजारासाठी पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून खरेदीचा आनंद घेतला.
















