सोलापूर – अ.भा.साने गुरुजी कथामाला अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बेळगाव येथे पार पडलेल्या ५८ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात, अरुण धुमाळ संपादित श्यामची आई पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.या पुस्तकाचे पुनर्लेखन, सोलापूरच्या प्रबोधन भारती प्रकाशनने केले आहे.
कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या अधिवेशनासाठी, डॉ. प्रा.आनंद मेणसे, पी.एस्.आय. परशुराम पुजारी, राजाभाऊ पाटील, लालासाहेब पाटील, शामराव कराळे,डॉ. गजानन कोटेवार, राष्ट्रीय प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी, कोषाध्यक्ष प्रा. अशोक म्हमाणे इ. मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती.
‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थना गायनानंतर, आकाश चौगुले (बेळगाव) यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.डॉ.कोटेवार यांनी कथामालेचा उद्देश स्पष्ट करुन सांगितला. या कार्यक्रमासाठी सोलापूर कथामालेचे अध्यक्ष अशोक खानापुरे,सदस्य रंगसिद्ध दसाडे, गंगाधर घोंगडे, सुरेंद्र पत्की,राजू बिराजदार, महादेव बाळगी इ.कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील पुजारी यांनी प्रास्ताविक केले.नीला आपटे (बेळगाव) यांनी सूत्रसंचालन केले तर कृष्णा शहापूरकर(बेळगाव) यांनी आभार मानले.
व्यासपीठावर आकाश चौगुले, लालासाहेब पाटील, राजाभाऊ पाटील, डॉ.गजानन कोटेवार,अरुण धुमाळ, सुनील पुजारी, अशोक म्हमाणे, अशोक खानापुरे इ.मान्यवर.
























