पिलीव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरवसेवस्ती (फळवणी) ता माळशिरस या ठिकाणी मकर संक्रातीचे निमित्त साधून शाळेमध्ये मातापालकांचा हळदी कुंक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील मुलांच्या सर्व माता त्याचबरोबर परिसरातील महिला भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या.
यावेळी माता पालकांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत प्रियांका सुरवसे , मेघा माने, क्रांती सुरवसे,शीतल सुरवसे, सुजाता सुरवसे यांनी उत्कृष्ट रांगोळी काढली.
या कार्यक्रमांमध्ये महिलांना पारंपारिक पद्धतीने हळदी कुंकू लावून वाण देण्यात आले. मुलांच्या गुणवत्तेमध्ये महिलांचे महत्त्व याविषयी शाळेतील शिक्षकांनी महिला पालकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय बेंदगुडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार पाटोळे यांनी मानले.


















