वळसंग – येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या श्री गौरीशंकर रामलिंग चनशेट्टी यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित बाळे मार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता जिल्हास्तरीय आदर्श लिपिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सदर पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट , पंढरपूर येथे सकाळी ११.००वाजता संपन्न झाला.
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सोसायटीच्या सर्व पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील आदर्श लिपिक पुरस्कार गौरीशंकर चनशेट्टी यांना फेटा बांधून शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून सपत्नीक गौरविण्यात आले .
सदर कार्यक्रमास प्राचार्य वीरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके, तानाजी जमादार , सिदधाराम भैरामडगी, बाळकृष्ण गुंड,निलकंठ कवटगी,सिध्दारूढ हिरेमठ, गंगाधर बिराजदार,प्रा.संतोष शिंदे, बसवराज दुधगी,वीरेश थळंगे, संतोष कस्तुरे, मल्लिनाथ गौडगाव,शिवराज अष्टगी , अजय माणकोजी, स्नेहा हळगोदे,वरिष्ठ लिपिका राजश्री दुधगी,सेवक कट्टेप्पा कोळी यांच्यासह गौरीशंकर चनशेट्टी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


















