सांगोला – मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. तिचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. कारण कोणतीही भाषा ही संस्कृतीचे जतन करत असते. मराठीच्या संवर्धनासाठी तिचा दैनंदिन व्यवहारामध्ये योग्य वापर व्हावा. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तिचे संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे मत श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढाचे प्रा.डॉ.राजकुमार पवार यांनी व्यक्त केले. ते सांगोला महाविद्यालयामध्ये मराठी विभाग, संगणक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, प्रा.डॉ.रामचंद्र पवार, प्रा.डॉ.आर.आर.ताटे उपस्थित होते. याप्रसंगी नंदा गायकवाड, अरुण बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये यश मिळविल्याबद्दल सेजल कवठेकर, तृप्ती सूर्यगंघ, प्रतीक्षा माने, सदानंद गजगे, प्रणव कुरूलकर, संदीप हिंगसे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय योगिता कांबळे हिने करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष लोंढे यांनी केले.
आभार श्रुतिका मसरे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.नवनाथ शिंदे, प्रा.डॉ.विद्या जाधव, प्रा.ए.डी.माने, प्रा.डॉ.एम.डी.वेदपाठक , प्रा.प्राप्ती लामगुंडे, प्र.अधिक्षक विलास माने, लिपीक बापू इंगोले, राहुल ढोले, बाबू इंगोले, अमर केदार, सुनिल शिंदे व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

























