Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तहसिल च्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त  जनजागृती रॅली

तरुण भारतbyतरुण भारत
January 26, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनजागृती रॅलीला विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचा शुभारंभ तहसीलदार विनायक मगर   गट विकास अधिकारी शंकर कवितके  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार गायकवाड ,  श्रीमंत सारणे , निवडणूक पर्यवेक्षक बसवराज गुरव, खेमू राठोड , आवण्णा वंटे, गौरीशंकर पुजारी, विजय पुजारी, मेघदूत हेर्लेकर, विनायक जाधव, हनुमंत गायकवाड, निलेश घोडके, नजमा नदाफ, गोकुळ डाके, शंकर कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 

चौकट

यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार  विनायक मगर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले  “भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदारामध्ये आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला तरच लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार बनेल. आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांनी लहान वयातच मतदानाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

निवडणूक नायब तहसीलदार श्री विजयकुमार गायकवाड साहेब यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देताना नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, वगळणी तसेच मतदार यादी अद्ययावत ठेवण्याच्या कामकाजावर प्रकाश टाकला. प्रत्येक पात्र नागरिकाने वेळेत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे व आवश्यक त्या सुधारणा करून घ्याव्यात, असे त्यांनी आवाहन केले.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “माझा मतदानाचा हक्क – माझी लोकशाहीची ताकद”, “एक मत – अनेक बदल”, “जागा व्हा, सजग व्हा, मतदान करा” अशा घोषणांच्या माध्यमातून जनजागृती केली. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि मतदानाबाबत सकारात्मक संदेश दिला. चौकट पुर्ण

या प्रसंगी निवडणूक पर्यवेक्षक 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी “मी नक्की मतदान करीन” अशी शपथ घेत लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढीस लागली असून लोकशाही अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन  बसवराज गुरव  यांनी केले 

आभार प्रदर्शन  समीर मणियार यांनी केले

Post Views: 41
Previous Post

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी चे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Next Post

‘मी विधवा नव्हे, मी स्त्री’… एकता महिला मंचच्यावतीने अभिनव उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

'मी विधवा नव्हे, मी स्त्री'... एकता महिला मंचच्यावतीने अभिनव उपक्रम

ताज्या बातम्या

गड्डा यात्रा आणि लग्नात चोरी करणाऱ्या महिलांना अटक

April 29, 2026
पं.विकास कशाळकर फाऊंडेशन यांच्यावतीने पं.उल्हासजी कशाळकर यांच्या गायनाची मैफिल

पं.विकास कशाळकर फाऊंडेशन यांच्यावतीने पं.उल्हासजी कशाळकर यांच्या गायनाची मैफिल

April 29, 2026
युवा उद्योजक तुषार धालगडे यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आ.कैलास पाटील यांच्या हस्ते सन्मान 

युवा उद्योजक तुषार धालगडे यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आ.कैलास पाटील यांच्या हस्ते सन्मान 

April 29, 2026
केमच्या उपसरपंच अनिता वायभासे यांची निवड

केमच्या उपसरपंच अनिता वायभासे यांची निवड

April 29, 2026
विचारक्रांती तर्फे भव्य आरोग्य शिबीर संपन्न…

विचारक्रांती तर्फे भव्य आरोग्य शिबीर संपन्न…

April 29, 2026
“न्यायदान हे माझे कर्तव्य, तर समाजप्रबोधन ही माझी नैतिक जबाबदारी – डॉ. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी

“न्यायदान हे माझे कर्तव्य, तर समाजप्रबोधन ही माझी नैतिक जबाबदारी – डॉ. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी

April 29, 2026
समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 29, 2026
मुस्लिम शिष्टमंडळ आणि अजित डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक

मुस्लिम शिष्टमंडळ आणि अजित डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836264

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697