सोलापूर : प्रबुद्ध भारत चौक,मिलिंद नगर, बुधवार पेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे व माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव इरफान शेख, नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, गौतम नागटिळक, ॲड. विशाल मस्के, शेरा मोकाशी, किरण साळवे व पवनकुमार मंडेपोल्लु या मान्यवरांनी आपल्या मनोगतात श्रद्धांजली वाहिली.
यावेळी भारत बाबरे, सुखदेव इंगळे, गौतम महाराज चंदनशिवे, बाळासाहेब तांबे, कन्हैया लालबिगी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष अजमल शेख, मोहन बनसोडे, बापू शिंदे, धम्मपाल मैंदर्गिकर, अमित माने, भीमा इंगळे, आदित्य चंदनशिवे, अक्षय मस्के, संदीप कापुरे, रवी काकडे, रंगा वाघमारे, प्रतीक चंदनशिवे, प्रा. अविनाश शिंदे, रवी सकट, प्रथमेश सुरवसे, सुमित चंदनशिवे, गौतम शिंदे, सागर देडे, कैलास वाघमारे, सुरज जगताप, अक्षय कुचेकर, मनोज थोरात, यशवंत आडाकूल, सुबन्ना स्वाके, भीमा मस्के, जयराज सांगे व पी.बी. ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

























