अक्कलकोट – स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांप्रमाणे माझ्या कुटूंबियांसह मलाही श्री. स्वामी समर्थांच्या जागृततेची व त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचिती आली आहे. यामुळे जीवन स्वामीमय झाले आहे. माझ्यासह अनेक भाविकांच्या जीवनात स्वामी भक्तीला अग्रस्थान आहे.
श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त असल्याने व पर्यटन मंत्री या नात्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील गतीविधींकडे नेहमीच माझे कटाक्षाने लक्ष असते. मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे हे गेल्या २० वर्षां पासून स्वामी सेवेत व्यस्त आहेत. त्यांनी अलीकडील काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कायापालट केलेले आहे, जे माझ्यासह तमाम भाविकांना खूपच भावलेले आहे. मंदिर समितीच्या विकासाचे ध्येय बाळगून समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अहोरात्र स्वामी सेवेत कार्यरत आहेत.
भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी भाविकांप्रती कोणतेही भेदभाव न ठेवता सर्वधर्म समभाव, तसेच मंदीरातील धार्मिक कार्याच्या व्याप्ती व भाविकांची गर्दी यांचा सुरेख संगम साधून गरीब श्रीमंत भाविकांप्रती समान आदरतिथ्य बाळगले आहे. कोणत्याही प्रकारचे दर्शन पासेस व शुल्क न आकारता सर्व स्वामी भक्तांना मोफत स्वामी दर्शनाची ठेवलेली सोय भाविकांना मोठे समाधान देऊन जाते. या माध्यमातून भाविकांची स्वामी भक्ती वृद्धिगत होत आहे. भाविकांची स्वामी भक्ती व भाविकांची वाढती संख्या पाहता स्वामी भक्तांच्या भक्तीतून स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय होत असल्याचे मनोगत गोवा राज्य पर्यटन मंत्री रोहन खऊंटे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी गोवा राज्य पर्यटन मंत्री रोहन खऊंटे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी गोवा राज्य पर्यटन मंत्री रोहन खऊंटे बोलत होते. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे, प्रसाद सोनार, दर्शन घाटगे, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, सागर गोंडाळ यासह स्वामीभक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – गोवा राज्य पर्यटन मंत्री रोहन खऊंटे यांचा सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.


























