Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर कॅन्सर सोसायटीच्या इमारतीला ‘प्रिसिजन’मुळे नवसंजीवनी

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी अनेक वर्षांपासून सेवाभावी कार्य करणाऱ्या सोलापूर कॅन्सर सोसायटीच्या इमारतीचे संपूर्ण नूतनीकरण प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या नूतनीकरणामुळे संस्थेच्या रुग्णसेवेला नवी दिशा मिळणार असून रुग्णांसाठी अधिक सुरक्षित, स्वच्छ व सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.

बुधवारी (दि. ४) नूतनीकरणानिमित्त सोसायटीच्या नूतन इमारतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर कॅन्सर सोसायटीच्या माजी सचिव कै. सुशीला पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्रिसिजनचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन शहा, सोलापूर कॅन्सर सोसायटीचे व्हॉइस चेअरमन डॉ. अरविंद देखणे, खजिनदार श्री. उत्तमराव डोईजोडे, मानद सचिव डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. शिरीष कुमठेकर यांच्यासह संस्थेचे सदस्य, डॉक्टर्स व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैद्यकीय उपचारांमुळे कॅन्सर होऊ शकतो बरा – डॉ. कुमठेकर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिरीष कुमठेकर यांनी केले. संस्थेची इमारत संरचनात्मकदृष्ट्या मजबूत असली तरी कालांतराने ती जीर्णावस्थेत गेली होती. रुग्णांची सुरक्षितता, सोय आणि स्वच्छतेच्या दृष्टीने नूतनीकरण अत्यावश्यक झाले होते. या संदर्भात डॉ. सुहासिनी शहा आणि श्री. यतिन शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण करून देण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या सहकार्यामुळे आज ही इमारत नव्या स्वरूपात उभी राहिल्याचे डॉ. कुमठेकर यांनी सांगितले. कॅन्सरविषयी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, आजच्या वैद्यकीय प्रगतीमुळे सुमारे ६० टक्के कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र यासाठी वेळेवर निदान आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. ४ फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो, असेही त्यांनी नमूद केले.

समाजोपयोगी उपक्रमांना प्रिसिजनचे सातत्यपूर्ण सहकार्य-  डॉ. शहा

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या की, इमारतीची अवस्था अतिशय खराब झाली होती आणि त्यामुळे रुग्णसेवेत अडथळे येत होते. म्हणूनच नूतनीकरण अपरिहार्य होते. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडने यापूर्वीही आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले असून भविष्यातही समाजोपयोगी उपक्रमांना सातत्याने सहकार्य करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गरजूंसाठी कॅन्सर सोसायटी ठरते आधारस्तंभ – 

सोलापूर कॅन्सर सोसायटीमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची नियमित सुश्रुषा केली जाते. अनेक रुग्णांना घरच्या घरी योग्य उपचार व देखभाल मिळत नाही, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे औषधोपचारांचा खर्च परवडत नाही. अशा गरजू व गरीब रुग्णांसाठी ही संस्था आधारस्तंभ ठरत आहे. इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाल्यामुळे आता रुग्णसेवा अधिक प्रभावी व सुरक्षित पद्धतीने करता येणार आहे. विशेष म्हणजे ही संस्था पूर्णतः देणग्यांवर चालत असून कोणतेही शासकीय अनुदान संस्थेला मिळत नाही.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे मानद सचिव डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सर्वांचे आभार मानले.

Post Views: 126
Previous Post

बिबट्या सदृश्य प्राण्याने गायीवर हल्ला करून केले ठार

Next Post

महाराजांच्या स्वराज्यसंकल्पनेत पूर्णपणे न्हाऊन निघालेला माणूस म्हणजे ‘बहिर्जी’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाराजांच्या स्वराज्यसंकल्पनेत पूर्णपणे न्हाऊन निघालेला माणूस म्हणजे 'बहिर्जी'

ताज्या बातम्या

खुशखबर …… जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा

July 22, 2026

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

July 22, 2026
बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

July 22, 2026

बार्शी तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न; तरुणावर पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल

July 22, 2026

भव्य शालेय दिंडी व विठ्ठल रुख्मिणी वेशभूषा स्पर्धा २०२६ #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0992244

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!