सोलापूर – पंढरपुर दारोड्यातील पाहिजे आरोपीस अटक करून १० घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करत १५० ग्रॅम चांदी व ११ ग्रॅम वजनाचे सोने, १ मोटार सायकल असे एकुण २ लाख ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. चोरीचा दागिने स्विकारणारा सराफ कारागिरास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी माळशिरस पोलीस ठाणे हद्दीत उंबरे दहिगाव या गावातील वाघमोडे वस्ती येथे अज्ञात चोरटयाने चार घरामध्ये घरफोडी चोरी करून सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरून नेले होते. त्यावरून माळशिरस पोलीस ठाणे गुरनं ५८९/२०२५ बीएनएस-२०२३, क. ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गोपनिय माहिती मिळाली की, पंढरपुर ग्रामीण पो. ठाणे ४७/२०२५, या दरोडयाच्या गुन्हयामधील पाहिजे आरोपी नामे रोहित दिपक पवार याने उंबरे दहिगांव येथील घरफोडी केली आहे. त्यानंतर सपोनि /भिमगोंडा पाटील व त्यांचे पथकाने आरोपीची गोपनिय माहिती काढुन आरोपी नामे रोहित दिपक पवार, वय २५ वर्षे, रा. नउचारी पदमावती नगर, अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापूर या अटक करून त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हया त्याचे साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले रा. चाकोरे अकलुज, भैय्या शकील शेख रा. विजबोर्ड जवळ वेळापुर याचे सोबत मिळुन केल्याची कबुली दिली. आरोपींकडे तपास करता त्यांनी त्याचे साथीदारासह गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी दिपक पवार यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेल्या मुद्देमाल पैकी १५० ग्रॅम चांदीचे, ११ ग्रॅम सोन्याचे दागिणे व रोख रक्क्म १२,०००/- रू. तसेच गुन्हयात वापरलेले १ मोटार सायकल असा एकुण १,४७,४००/- रू त्याची (बाजार भाव प्रामणे) एकुण २,७८,७००/- रू किमंतचे सोन्या चांदीचे दागिणे आरोपी यांचेकडुन हस्तगत करण्यात आले.
आरोपी दिपक पवार याने त्याचे वाटणीस आलेला मुद्देमालापैकी १२ तोळे सोन्याचे दागिणे सोनार कारागिर वैभव दिगंबर कुलथे रा. देशमुख गल्ली अकलुज यास विक्री केले असल्याचे सांगितलेने सदर गुन्हयात बीएनएस – २३ चे कलम ३१७(२), ३(५) प्रमाणे कलम वाढ करून आरोपी नामे वैभव दिगंबर कुलये रा. देशमुख गल्ली अकलुज यास दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास इकडील सहा. पोलीस निरीक्षक, भिमगोंडा पाटील ने. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, भिमगोंडा पाटील व पथकातील, पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोकों/सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, चापोकों/ दिलीप थोरात तसेच सायबर पो. ठाणे कडील पोहवा / व्यंकटेश मोरे यांनी बजावली.

















