नवीन नांदेड – भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी आणि राष्ट्रीय सचिव नवज्योत संधू, प्रभारी यांची व राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला यांच्या आदेशानुसार सत्यजित बिरादार यांची संघटनात्मक, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जडणघडणात भर पाडण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील पक्ष बळकटीसाठी पक्षाच्या विविध क्षेत्रातून आपल्या कार्यात जाण्याची संघटनात्मक, सामाजिक, राजकीय घडामोडीतून खुशल कार्य अविरत करत असणाऱ्या युवकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सत्यजित संभाजी बिरादार यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाच्या बळकटीस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्यजित बिरादार यांची प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती बदल डि.बी.जांभरूणकर, गोविंद मेथे, व्ही.एस पाटील, शेख निजाम, जी.एन. कोरेवार यांच्यासह कुसुमताई विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सत्यजित बिरादार यांचे अभिनंदन करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या

























