सोलापूर- मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने नूतन महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांचा सत्कार केएमसी गार्डन येथे माजी महापौर अरिफ शेख यांच्या हस्ते आणि राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन, महापुरुषांना अभिप्रेत अस काम करत शहराची एकता शांतता प्रस्थापित करण्याच काम मुस्लिम ब्रिगेडकडून होत असून हे कौतुकास्पद आहे. याचा मला अभिमान वाटत आहे, असे मत महापौर विनायक कोंडयाल यानी व्यक्त केले.
याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर, सौ. मनोरमा सपाटे, अकिला भागानगरी, वाहेदा भंडाले, सोफीया चौधरी, श्रीदेवी फुलारी, अमोल शिंदे, अमर पुदाले, विनोद भोसले, अजहर हुंडेकरी, गौतम कसबे, युवराज सरवदे, अनिकेत पिसे, बाबा अडेवाले, शिवाजी वाघमोडे, सिध्दार्थ मंजेली, शिवजन्मोसत्व महामंडळचे अध्यक्ष जयवंत सलगर, राष्ट्रीय बॉडी बिल्डरपटू भागवत शिंदे, असिफ पठाण यादींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुनाफ चौधरी, माजी प्राचार्य दलाल, इम्तियाज कमिशनर, अल्ताफ लिंबूवाले मुबीन सय्यद हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम ब्रिगेड शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, राम गायकवाड, जावेद बद्दी, बशीर सय्यद, तन्वीर गुलजार, गफूर शेख, रिजवान शेख, हारिस शेख, रुस्तुम शेख, मुबीन शेख, शबिर फुलमामडी, अमजद पठाण, उजेर बागवान, फुरखान बॉम्बे, अफान बागवान आदी उपस्थित होते.






















