जेऊर – संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा जि अहिल्यानगर येथील खंडोबा देवगड यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय अश्वनृत्य स्पर्धेत शेटफळ तालुका करमाळा येथील नामदेव साबळे यांच्या बादशहा घोड्याने प्रथम क्रमांक मिळवत तो महाराष्ट्र अश्वकेसरीचा मनकरी ठरला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात देवगड अश्व सेवा संस्था आणि ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा यात्रेनिमित्त भव्य पशुपक्षी प्रदर्शन व राज्यस्तरीय अश्वस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या आश्वास स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे नामांकित घोडे मालक आपले अश्व घेऊन आले होते.
यामध्ये देखना अश्व व अश्वनृत्य स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत शेटफळ तालुका करमाळा येथील नामदेव साबळे यांच्या बादशहा घोड्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे संगमनेर विधानसभेचे विद्यमान आमदार अमोल खताळ व स्पर्धा पंच गोपा कापरे यांच्या हस्ते साबळे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस पारितोषकासह प्रदान करण्यात आले साबळे यांना अश्व पालनाचा छंद असून गेले पंधरा वर्षापासून त्यांनी हा छंद जोपासला आहे.परासरातील विवाह व इतर समारंभांमध्ये नृत्य करणारे अश्व त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या बादशहा घोड्याची मोठी ख्याती या परिसरामध्ये आहे .




















