अक्कलकोट : श्री विश्वकर्मा मय पांचाळ समाजाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही श्री कालिकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवानंद सुतार यांनी एका पत्रका अन्वये दिली आहे.
सदरील महोत्सव बुधवार दि. १८ मार्च २०२६ ते सोमवार दि.२३ मार्च २०२६ या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सर्व समाजबांधवांनी या महोत्सवात उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महोत्सवाची सुरुवात दि.१८ मार्च रोजी दीपप्रज्वलन व कालिका महोत्सव प्रारंभाने होणार आहे. दि. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी व रात्री देवीस महाअभिषेक व महापूजा तसेच महाआरती होणार आहे.
दि. २० मार्च रोजी सकाळी महाअभिषेक व महापूजा, दुपारी सामुदायिक उपनयन (मुंज) सोहळा, प्रीती भोजन व रात्री महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२१ मार्च रोजी सकाळी महाअभिषेक व महापूजा, १०८ दाम्पत्यांसह दुर्गा सप्तशती हवन आणि रात्री महाआरती होणार आहे.
दि.२२ मार्च रोजी सकाळी महाअभिषेक व महापूजा, राज्यस्तरीय वधू-वर नाव नोंदणी शिबिर व महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
दि. २३ मार्च रोजी सकाळी महाअभिषेक व महापूजा, सुवासिनी भोजन, महाप्रसाद, भव्य पालखी मिरवणूक व रात्री महाआरतीने महोत्सवाची सांगता होणार आहे.
हा महोत्सव उ. कसबा, मसरे गल्ली, सोलापूर येथील श्री कालिका देवस्थान येथे पार पडणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विश्वकर्मा मध्य पांचाळ समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.






















