बार्शी – येथील दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे आज शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती ्सं संगीता काळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीकांत कुंभारे, सचिन काळे, युवराज जगताप, सुनिल लंगोटे, मंगेश मोरे, श्रीमती ललिता चव्हाण, चंद्रकांत लोखंडे, .्रा राहुल ठोंगे, संतोष ठोंबरे, सौ. शितल पाटील स्पर्धा समन्वयक म्हणून नपाचे विजय काळे उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आरोग्य विभाग नगरपालिका बार्शीमार्फत दोन गटात घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत शाळेतील खालील विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले
गट- ५ वी ते ७ वी- प्रथम- कु. स्वरांजली सुरेश साळुंके (७ वी) द्वितीय- कु. नाजीया निजामोद्दीन शेख (६ वी) तृतीय- कु.भारती किरण गोरे (५ वी) उत्तेजनार्थ -१) श्रीतेज सुरेश काळे (६ वी) २) कु.भारती प्रवीण समुद्रे (६ वी)
गट- ८ वी ते १० वी- प्रथम- कु.श्रुती सुरेश काळे (९ वी) द्वितीय- कु.साक्षी सतीश मुसळे (८ वी) तृतीय- कु. राजनंदिनी किरण गोरे (८ वी) उत्तेजनार्थ- १) अभय चंदन साळवे (८ वी) २) अरमान इब्राहिम शेख (९ वी) मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकास १००० रुपये व ट्रॉफी, द्वितीय- ८०० रुपये व ट्रॉफी, तृतीय ६०० रुपये व ट्रॉफी तसेच उत्तेजनार्थसाठी ट्रॉफी अशा बक्षिसांचे वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून युवराज जगतात व स्पर्धा समन्वयक म्हणून नपाचे विजय काळे यांनी काम पाहिले.






















