जेऊर – करमाळा तालुक्यातील जेऊर मंडलचे मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तिफन कृषी गौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे
अहिल्यानगर येथील तिफन फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी तिफन कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षीचा हा पुरस्कार जेऊर मंडळचे मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांना जाहीर झाला असून अहिल्यानगर येथे लवकरच एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मारकड यांनी कृषी विभागातील सेवाकाळात शेतकऱ्यांना उत्कृष्ट सेवा देऊन शाश्वत शेती नविन तंत्रज्ञानाचा प्रसार व शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत त्यांच्या जीवनात बदल घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे
कृषी विस्तार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत जेऊर मंडल कृषी अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळवून दिले आहे. शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे






















