Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लाखो भाविकांनी घेतले होटगी मठातील १००८ शिवलिंगाचे दर्शन

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in social
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाशिवरात्रीनिमित्त अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिराचे, मंदिर परिसरात असलेल्या श्रीशैल पीठाचे आद्य जगद्गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या लिंगोद्भव मूर्तीचे व तिच्याभोवती असलेल्या १००८ शिवलिंगाचे दर्शन घेऊन लाखो भाविक धन्य झाले.

     श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने श्री १००८ जगद्गुरु पंडिताराध्य, विश्वाराध्य जयंती व महाशिवरात्र महोत्सव काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाली . रविवारी सकाळी ६.०० वा. अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी मंदिरातील पंचमुखी परमेश्वर लिंगास व ७.०० वा. बाळीवेस येथील मठात श्री १००८ जगदाचार्य मूर्तीस, महारुद्राभिषेक, सहस्त्रबिलवारचंन महामंगलारती करण्यात आली. ८.०० वा. थोबडे यांच्या वाड्यातून श्री पंडिताराद्य लिंगोद्भव मूर्तीचे मठात आगमन झाल्यानंतर रथपूजा करून श्री १००८ जगद्गुरु पंडिताराध्य व विश्वाराध्य मूर्तीच्या सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ झाला.

    बैलजोडी, शंकराची मूर्ती, रेणुकाचार्यांची मूर्ती, जगद्गुरु पंडिताराजांची प्रतिमा, जगद्गुरु विश्वाराद्यांची प्रतिमा, रथ, शिवलिंगाची व श्री वीरतपस्वीजींची प्रतिमा, सनई, चौघडा, हलगी, बँड आदी पारंपारिक वाद्यासह ही मिरवणूक उत्तर कसबा, होटगी मठ ,मल्लिकार्जुन मंदिर, मंगळवार पेठ पोलीस चौकी, कुंभार वेस, मधला मारुती ,कन्ना चौक, जोडबसवणा चौक , पाण्याची टाकी, अक्कलकोट नाका या मार्गाने एमआयडीसी येथील श्री वीरतपस्वी मंदिरात चिटगुपाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सानिध्यात मिरवणुकीची सांगता झाली.

     या मिरवणुकीत संस्थेच्या विविध प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक व शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे झेंडा पथक, टिपरी ,लेझीम, झांज पथक, पारंपारिक वेशभूषेतील नृत्य पथक विविध आकर्षक गणवेशात खेळाचे प्रात्यक्षिक सादर करीत होते सायंकाळी ७.००वा.दीपोत्सव कार्यक्रम, रात्री ९.०० वा. वीरतपस्वी पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणातून वीरतपस्वी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री ९.३० वा. शोभेच्या दारूकामाने कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिरात रात्री भजन, १२.१८ ते १.१८ पर्यंत विशेष महाअभिषेक पूजा संपन्न झाली. 

      मिरवणूक मार्गावर मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थी व भक्तासाठी मधला मारुती व्यापारी संघटना, डी.एन. सुगंधी, हरी ओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था आदि सामाजिक संघटनानी उपवासाच्या फराळाचे व पाण्याची व्यवस्था केली होती .मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भक्त सहभागी झाले होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी प्रयत्न केले. 

महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता यावर्षी संस्थेकडून दर्शनी भागात व मंदिरात बेरीगेट्स लावण्यात आलेले होते .दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष व स्त्रिया यांचे स्वतंत्र रांग करण्यात आलेली होती. पार्किंगची व्यवस्था व पोलिसांच्या चोख बंदोबस्ताबरोबरच विविध ठिकाणी संस्थेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यामुळे तोबा गर्दी असूनही भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता आले. संस्थेच्या या शिस्तबद्ध नियोजनाचे भाविकांनी कौतुक केले.

१लाख भाविकांना प्रसादाचे वाटप 

श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीच्या मंगल दिवशी सकाळी ८.०० वाजल्यापासून रात्री १०.००पर्यंत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना श्री वीरतपस्वी अन्नछत्रात प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती. १ लाखापेक्षा जास्त भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.

रांगोळीतून साकारले महादेवांची व वीरतपस्वीजींची प्रतिमा-  

महादेवाचे निसिम भक्त असणारे मल्लिनाथ जमखंडी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वीरतपस्वी मंदिरात १५×१५ फूट आकाराचे जटाधारी महादेवाचे व हतुर ता. द. सोलापूर येथील वर्षा वाले येणे १५×२२ फूट आकाराचे वीर पस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रतिमा रांगोळीतून साकारून आपली सेवा समर्पित केली. मिरवणुकीत एस व्ही. सी. एस. हायस्कूल भवानी पेठ येथील विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ हा जनजागृतीचा संदेश दिला विद्यार्थी फलक घेऊन सामील झाले होते.

                 

दर्शनाबरोबर भावगीतांचा लाभ- 

यंदाच्या वर्षी संस्थेकडून प्रसिद्ध कलाकार अतुल बेले यांच्या ‘संगीत संध्या’या भाव-भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. दर्शन व महाप्रसाद झाल्यानंतर भाव-भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचा आनंदही भाविकांनी घेतला.

Post Views: 29
Previous Post

कृषी अधिकारी मधुकर मारकड यांना तिफन कृषी गौरव पुरस्कार

Next Post

सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे काँग्रेस भवनासमोर आंदोलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे काँग्रेस भवनासमोर आंदोलन

ताज्या बातम्या

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 20, 2026

दहिगावच्या सुरडकर कुटुंबाची पाचवी पिढी जपत आहे ही परंपरा

April 20, 2026

सुखी जीवनासाठी संयम हीच खरी गुरुकिल्ली – मुनीश्री वीरसागर महाराज

April 20, 2026

मंठा येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा संपन्न

April 20, 2026

विचार नसलेल्या व्यक्ती समाज माध्यमात व्यक्त होत असल्याने सामाजिक प्रदूषण वाढले – प्रा. कळमकर

April 20, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

लिंगायत स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा योजनेबाबत पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे #public #marathinews

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0821700

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697