Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत व्यावसायिक महिला व पुरुष गटात थरारक सामने

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in sports
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : खो-खो प्रेमींसाठी सध्या दादरमधील कै. अजितदादा पवार क्रीडा नगरी हेच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेत खेळाडूंनी वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि जिद्दीचे अप्रतिम दर्शन घडवले आहे. महिला आणि पुरुष गटातील साखळी सामन्यांत पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बँक ऑफ इंडिया यांनी दमदार विजय नोंदवत विजेतेपदासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.

 

महिला गट : पश्चिम रेल्वेचा मुंबई पोलिसांवर दणदणीत विजय

महिला गटातील साखळी सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले आणि मुंबई पोलिसांवर २२–१३ असा ५.४० मि. राखून ०९ गुणांनी विजय मिळवला. विजयी पश्चिम रेल्वेच्या कल्याणी कंक (नाबाद १ मि. संरक्षण व ६ गुण), अर्चना माजी (३.३० मि. संरक्षण), निसार के एम (नाबाद १.३०, २.५० मि. संरक्षण व २ गुण), सुहानी धोत्रे (३.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दमदार खेळ करत विजय निश्चित केला. पराभूत मुंबई पोलिसांच्या पायल पवार (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), श्रेया सनगरे (२ मि. संरक्षण), अंजली कनोजिया (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), दिक्षा सोनसुतकर (२ गुण) यांनी चांगली झुंज दिली, मात्र विजयापासून दूर राहिल्या. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

 

महिला गट : पश्चिम रेल्वेचा महावितरण कंपनीवर एकतर्फी धुव्वा

महिला गटातील साखळी सामन्यात पश्चिम रेल्वेने महावितरण कंपनीचा २५–०२ असा १ डाव व २३ गुणांनी एकतर्फी पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. विजयी पश्चिम रेल्वेच्या अर्चना माजी (५.४० मि. संरक्षण व ४ गुण), किशोरी मोकाशी (नाबाद १.२० मि. संरक्षण), कल्याणी कंक (६ गुण), शिवानी धोत्रे (४ गुण), संध्या सुरवासे (४ गुण) यांनी सलग प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही. पराभूत महावितरण कंपनीच्या मनाली काजारे (१ मि. संरक्षण), मिना कांबळे (१.३० मि. संरक्षण), देविका अहिरे (१.४० मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले, मात्र पश्चिम रेल्वेच्या भक्कम आक्रमणासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या सामन्यावर संदीप केदार यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

 

पुरुष गट : बँक ऑफ इंडियाचा रचना नोटरी वकर्सवर नाट्यमय विजय

या सामन्यात रचना नोटरी वकर्सने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले, मात्र बँक ऑफ इंडियाने २५–२३ असा २ गुणांनी थरारक विजय मिळवला. विजयी बँक ऑफ इंडियाच्या जर्नादन सावंत (१, नाबाद २.०६ मि. संरक्षण व २ गुण), विजय देठे (२.२५ मि. संरक्षण व ६ गुण), सुजल जायगडे (२.५६ मि. संरक्षण व ६ गुण), राज सकपाळ (४ गुण) यांनी सलग प्रभावी कामगिरी करत विजय साकारला. पराभूत रचना नोटरी वकर्सच्या प्रथमेश दुर्गावळे (२, १.४० मि. संरक्षण व २ गुण), ओमकार मिरगळ (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), रुपेश कोंढाळकर (१.१५ मि. संरक्षण व ४ गुण), भावेश बने (१.५०, १.१० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढा दिला. या सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

 

पुरुष गट : बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुंबई पोलिसांवर विजयी झेप

या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले आणि मुंबई पोलिसांवर २८–२६ असा २ गुणांनी विजय मिळवला. विजयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्जुन अनिवासे (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), संचित कंक (१.४० मि. संरक्षण व ६ गुण), पियुश घोलम (१.२० मि. संरक्षण व ८ गुण), अजय मित्र (१ मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाके (१, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सलग उत्कृष्ट खेळ करत विजय निश्चित केला. पराभूत मुंबई पोलिसांच्या आकाश हजारे (२ मि. संरक्षण व २ गुण), अक्षय खापरे (२.१०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), वेदांत देसाई (१, १.५० मि. संरक्षण व ४ गुण), हनुमंत जगताप (६ गुण) यांनी शेवटपर्यंत जोरदार प्रतिकार केला. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

 

स्पर्धेची रंगत शिगेला : व्यावसायिक खो-खोचा नवा इतिहास घडतोय

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेत प्रत्येक सामना अधिक चुरशीचा आणि रोमांचक होत असून, खेळाडूंच्या उत्कृष्ट कौशल्याने अजितदादा पवार क्रीडा नगरी अक्षरशः दणाणून गेली आहे. वेगवान खेळ, अचूक बचाव आणि आक्रमणाच्या जोरावर संघ विजेतेपदासाठी झुंज देत असून, ही स्पर्धा खो-खोच्या व्यावसायिक युगाचा नवा अध्याय लिहित आहे.

Post Views: 49
Previous Post

महापालिकेच्या वतीने थोर संतांना अभिवादन

Next Post

राज्यस्तरीय आय एम ए रनेथॉन लातूर स्पर्धेत साईश्वर, श्रद्धा व वैशाली गुंटूक प्रथम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्यस्तरीय आय एम ए रनेथॉन लातूर स्पर्धेत साईश्वर, श्रद्धा व वैशाली गुंटूक प्रथम

ताज्या बातम्या

शहराच्या विकासावर जिल्हाधिकाऱ्यांचा पत्रकार संघात पत्रकारांशी वार्तालाप

August 7, 2026

गुंगी गुडिया वक्तव्यावर बोलल्या सौ फडणवीस #viral

August 7, 2026

जरांगे पाटलांबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री #viral

August 7, 2026

अमित शहांनी राहुल गांधीच्या परदेशी वाऱ्याची कुंडलीच मांडली #viral

August 7, 2026

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव

August 7, 2026

आ.देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश सोलापूरचा साडीचा पारंपारिक वस्त्रोद्योगात समावेश

August 7, 2026

राज्यभरात बाईक टॅक्सी विरोधात वाहतूक संघटनेचे निवेदन

August 7, 2026

विडी कामगाराचा जल्लोष किमान वेतन हक्क समितीच्या लढ्याला मिळाले यश

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033105

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!