लातूर – येथे एल डी सी सी बँक लातूर व समिट इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत आयोजित आय एम ए रनेथॉन या मॅरेथॉन स्पर्धेत जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशाला येथे इयत्ता दहावीत शिकत असलेले राष्ट्रीय धावपटू साईश्वर व श्रद्धा केशव गुंटूक तसेच आई वैशाली केशव गुंटूक यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविले आहेत. 13 ते 30 वर्षे पुरुष वयोगटात साईश्वर 5 किमी अंतर कमी वेळेत पूर्ण करत स्वतःचेच विक्रम मोडीत काढून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. श्रद्धा हिने 13 ते 30 वर्षे महिला वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविले आहे तर वैशाली केशव गुंटूक यांनी 31 ते 45 या महिला गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विजेत्यांचे सहकार मंत्री मा. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वर्गीय माजी मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, एल डी सी सी बँक व समिट इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष, RCC अकॅडमीचे अध्यक्ष श्री. मोटेगांवकर, स्पर्धेचे आयोजक प्रेसिडेंट डॉ. अभय कदम, डॉ. अजय जाधव, आयोजिका डॉ. वैशाली चपळगावकर, प्रेसिडेंट WDW डॉ. ज्योती सूळ, डॉ. प्रियांका दवले तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टर्स यांची प्रमुख उपस्थिती होती. साईश्वर व श्रद्धा बंधू भगिनी गेले 6 ते 7 वर्षापासून 2028 मध्ये होणार्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.
साईश्वर व श्रद्धा यांना सिनियर ऑलिम्पियन केशवराज सिंह, स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे, प्राचार्य चिदानंद माळी, क्रीडाप्रशिक्षक कृष्णा कोळी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.




















