सोलापूर – दमाणीनगर येथील शुभम हॉस्पिट्यालीटी या सांस्कृतिक सभागृहामध्ये रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ संचलित भैरूरतन दमाणी अंधशाळा येथील अंतरराष्ट्रीय पातळीवरील अंध महिला क्रिकेट सामन्यामध्ये विजेती उपकर्णधार भारतीय संघाला जागतिक क्रिकेट चषक मिळवून देण्यामध्ये बहुमूल्य योगदान दिलेले आहे व जिच्या कामगिरीमुळे भारत हा आंतरराष्ट्रीय अंध महिला क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत विश्वविजेता ठरू शकला, अशा दैदीप्यमान यश संपादन केलेल्या कु. गंगा संभाजी कदम हिचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी प्रास्ताविक श्री. संतोष भंडारी (सचिव) भैरूरतन दमाणी अंधशाळा यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेने आजपर्यंत घडवलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा सादर करताना त्यापैकी गंगा संभाजी कदम ही एक सर्वात यशवंत अशी अंध विद्यार्थी निर्माण झाल्याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. असे प्रतिपादन केले, त्यानंतर कुमारी श्रद्धा लंगोटे यांनी उपस्तितांसमोर स्वागत गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. दिपप्रजवलन उपस्थित अतिथींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर” (हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला” असे समुहगीत अंध बाल कलाकारांनी सादर करून सगळ्यांच्या टाळ्या मिळवल्या.
या कार्यक्रमात गंगा कदम हिला शाळेतर्फे मानपत्र देण्यात आले. तिच्या कर्तृत्वाचा गौरव त्यामधून करण्यात आला. तसेच सर्वांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, व सन्मानपत्र देऊन संस्थेतर्फे यथोचित गौरव करण्यात आला. डॉ. सिद्धेश्वर वाले यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. संतोषजी सपकाळ (अध्यक्ष) रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ व तसेच प्रमुखपाहूनणे म्हणून प्रेमरतनजी दमाणी,. बिमलादेवीजी दमाणी, व राजेशजी दमाणी हे उपस्थित होते. दमाणी यांनी गंगा कदम हिला क्रिकेटच्या सरावासाठी लागणार्या सर्व सुविधा देऊन सहकार्य करून तिला प्रोत्साहीत केले. श्री दमाणी यांनी या खेळामध्ये अधिक उच्चस्थर प्राप्त करण्यास गंगा साठी प्रशिक्षक उपलब्ध करून दिले. त्यांच्या सहकार्यातून हे यश तिला प्राप्त होऊ शकले. या यशात श्री दमाणी यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे.
आपल्या मनोगतामध्ये गंगा हिने माझ्या यशामध्ये या शाळेचे तसेच दमाणी परिवार आणि दमाणी अंधशाळेचे पदाधिकारी व सचिव श्री. संतोष भंडारी यांचे विशेष उल्लेख करून आजपर्यंत त्यांनी जे बहुमूल्य सहकार्य केले त्यामुळे हे यश मला प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली. श्री राजू शेळके यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे मला यात कामगिरी करणे सोपे केले असेही तीने प्रतिपादन केले शाळेतील सर्व शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. श्री दमाणी यांनी गंगा कदम हिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व यापुढेही असेच सहकार्य कायम राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.
याप्रसंगी गंगा कदम यांना सहकार्य करून यशस्वी मार्गक्रमण करण्यास मदत केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी साम्राणी, श्रीमती डिसूजा, अजिंक्य बहुले (इलेजियम क्लब) सर्व प्रतिनिधी जामश्री इंडस्ट्रीज प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात आला. जैन सोशल ग्रुप यांच्याही प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व हा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अंध विद्यार्थी, मूकबधिर विद्यार्थी राधाकिसन फोमरा मूकबधिर विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी, प्राचार्या क्षितिजा गाथाडे, रोटरी नॉर्थचे पदाधिकारी, भैरूरतन दमाणी अंधशाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी, व तसेच रेडीमेड असोसिएशनचे विजयजी डाकलिया, रमेशजी डाकलिया, श्री. अजयजी रंगरेज, श्री. सुनीलजी मेंगजी. जैन सोशल ग्रुपचे श्री चेतन जी सुराणा,. गौतमजी छाजेड, राजेशजी निमाणी, रमेशजी डाकलीय. इलेजीयम क्लबचे मॅनेजर शर्ली डीसुजा, ऋतू भोसले, अनीलजी साम्राणी आदी मान्यवर उपस्थीत होते.
भैरूरतन दमाणी अंधशाळा शिक्षक व कर्मचारी, राधाकीसन फोमरा मुखबदीर विद्यालय, जैन सोशल ग्रुप यांच्यावतीने गंगा कदम हिचा सत्कार करण्यात आला.




















