अक्कलकोट – येथे लव जिहादच्या विरोधात तालुक्यातील सर्व महिला वर्गांनि एकत्रित येऊन तहसीलदार व दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन शासन निर्णयाची फोटो फ्रेमचे प्रत भेट देण्यात आला.या हिंदू धर्मातील मुली व महिलाच्या संरक्षणासाठी केलेला आगळा वेगळा आंदोलनमुळे प्रशासन जागे झाला आहे.
मैंदर्गी चे नगराध्यक्षा सौ.अंजलीताई योगीनाथ बाजारमठ, नगरसेविका सौ. सुरेखाताई होळीकट्टी यांनी अत्यंत जबाबदारीने व प्रभावीपणे या आंदोलन यशस्वीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्व नियोजन शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.धर्मो रक्षति रक्षित: साठी आपली एकजूट, सजगता आणि सामाजिक बांधिलकी हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे.
अशाच प्रकारे अन्यायाविरुद्ध आपण एकत्र येऊन आवाज उठवत राहवा म्हणून नगराध्यक्षा सौ.अंजलीताई योगीनाथ बाजारमठ नगरसेविका सौ. सुरेखाताई होळीकट्टी सह सर्व जागृत नगरसेविका, धैर्याने सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनी तसेच उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाऱ्या युवती वर्गाचे सकल हिंदू समाज, मैंदर्गी यांच्या वतीने स्वागत करून आभार मानले.




















