सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी ब्रिज येथील श्री पंचाक्षरी प्रशाला कन्नड माध्यमच्या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मुख्याध्यापक बसवराज म्हेत्री अध्यक्षस्थानी होते. यावेळी शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष जट्यप्प्पा कुंभार व उपाध्यक्षा महानंदा यमदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत दहावी वर्षातील अनुभव व्यक्त केले. तर प्रमुख पाहुणे श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचे मंत्र सांगून आयुष्यात आई, वडील व गुरूजनांचे आदर करण्यास सांगितले. तसेच यश प्राप्त करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सिद्धाराम पुजारी, गिरमला गुड्डेवाडी, गिताबाई धुळखेड, पल्लवी भैरगोंड व अंकुश व्हनमाने , भिमगोंडा बिराजदार, म्हांतया स्वामी, गणपती कुंभार , गजानन बिराजदार शिक्षकांसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

























