सोलापूर – ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून घरकुल योजनेचे हप्ते आता जमा होत असले, तरी घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या मोफत वाळूच्या पुरवठ्याचा प्रश्न अद्याप अनेक ठिकाणी कायम असल्याचे चित्र आहे. शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद असतानाही प्रत्यक्षात ती मिळत नसल्याच्या तक्रारी दक्षिण सोलापूरसह मोहोळ तालुक्यात वाढत आहेत.
याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट केले. “घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर योजनेचे हप्ते नियमित जमा होत आहेत. मात्र मोफत वाळू वितरणासंदर्भातील तक्रारींची तालुकास्तरावर माहिती घेण्यात येईल. गटविकास अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवून आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकाम सुरू केले आहे. आर्थिक मदतीचा हप्ता मिळत असला तरी वाळू उपलब्ध न झाल्याने बांधकामाचा वेग मंदावल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून होत आहे. काही ठिकाणी वाळू खरेदीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने घरकुलाचे अंदाजपत्रक कोलमडत असल्याचेही सांगितले जात आहे.
शासनाची घरकुल योजना ही केवळ आर्थिक मदत देण्यापुरती मर्यादित नसून लाभार्थ्याला प्रत्यक्षात घर उभे राहणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हप्त्यांसोबतच बांधकामासाठी आवश्यक साहित्य उपलब्धतेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे. आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून तालुकानिहाय वस्तुस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याने मोफत वाळू वितरणातील अडथळे दूर होतात का, याकडे हजारो घरकुल लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या या हालचालीमुळे घरकुल बांधकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट
योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांच्या पक्क्या घराच्या स्वप्नांना अखेर नवसंजीवनी मिळाली आहे. तांत्रिक अडचणींमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गतचे अनुदान वितरण पुन्हा सुरू झाले असून जिल्ह्यातील ७,७५६ लाभार्थ्यांच्या खात्यावर ३३ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या घरकुल बांधकामांना आता वेग मिळणार आहे. तालुकास्तरावर मोफत वाळू वितरण संबंधी माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
– कुशल जैन, सी. ई. ओ जिल्हा परिषद सोलापूर
चौकट
घरकुल लाभाचे टप्पे
घरकुल योजनेअंतर्गत अनुदान चार टप्प्यांमध्ये दिले जाते. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३४० लाभार्थ्यांना ५१ लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात ३,१५९ लाभार्थ्यांना २२.११ कोटी रुपये, तिसऱ्या टप्प्यात ३,४९४ लाभार्थ्यांना १०.४८ कोटी रुपये तर अंतिम टप्प्यात ७६३ लाभार्थ्यांना ३८.१५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
चौकट
कोणत्या तालुक्याला किती निधी
अनुदान वितरणात अक्कलकोट आणि करमाळा तालुके आघाडीवर असून अक्कलकोटला ५.६१ कोटी रुपये तर करमाळ्याला ४.६५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापाठोपाठ माढा, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, सांगोला आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील लाभार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...
सांगोला - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...