सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज तुळजापूर नाका, मड्डी वस्ती परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत चार टपऱ्या, चार चाकी चार हात गाड्या, पत्रा शेड जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशीत करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज तुळजापूर नाका परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासन त्याचबरोबर काही नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
यामुळे येथील रस्त्यावरील अडथळा दूर झाला.
दरम्यान या कारवाईत अतिक्रमित चार चाकी चार हात गाड्या , चार टपऱ्या जागेवरच निष्काशीत करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर अडथळा ठरणारे कट्टे आणि समोर आलेले सुमारे 15 पत्रा शेड जमीनदोस्त करण्यात आले, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.
विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करू नये. रस्त्याला अडथळा आल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याला अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती आणि इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.

























