सोलापूर – केडरसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीत एकूण १०२ उमेदवारांनी १०९ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे.
सर्वसाधारण बार्शी तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत, पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक, मोहोळमधून मदन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. तिन्ही मतदारसंघात या तिघांचे एकेकच अर्ज दाखल झाले आहेत. याच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. तसेच मंगळवेढा मतदारसंघातून बबनराव आवताडे व त्यांचे पुत्र सिध्देश्वर व सुशील आवताडे या तिघांचेच अर्ज दाखल झाल्याने येथील निवडही बिनविरोधच्याच मार्गावर आहे.
यातील सिद्धेश्वर आवताडे यांची जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे केडरसाठी आता बबनराव आवताडे की सुशील आवताडे यांचा अर्ज कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दाखल अर्जांची छाननी उद्या सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात करण्यात येणार आहे. त्यामुळे या छाननीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट
एकूण जागांसाठी १०२ उमेदवार
केडरच्या संचालक मंडळाच्या एकूण १६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रतिनिधींच्या तालुकानिहाय ११ जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाची एक, इतर मागासवर्गीय प्रवर्गाची एक, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गाची एक आणि महिला प्रतिनिधींच्या दोन जागांचा समावेश आहे. या जागांवर तब्बल १०२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
चौकट
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ८ डिसेंबर रोजी चिन्हवाटप होणार आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल, तर २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे.
चौकट
मतदारसंघनिहाय दाखल उमेदवार पुढीलप्रमाणे.
सर्वसाधारण 11 जागा
अक्कलकोट : मिलन कल्याणशेट्टी, शिवानंद पाटील.
बार्शी : रणवीर राऊत.
करमाळा : जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, सुभाष गुळवे, बबन मेहेर.
माळशिरस : धैर्यशील मोहिते-पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, सुरेश पाटील, मनोज शेळके, किरण शिंदे.
माढा : संजयमामा शिंदे, सतीश केचे, रणजित शिंदे, सुरेश पाटील, प्रतापसिंह पाटील, ज्ञानदेव टोणपे.
मंगळवेढा : बबनराव आवताडे, सिध्देश्वर आवताडे, सुशील आवताडे.
मोहोळ: मदन पाटील.
पंढरपूर : प्रणव परिचारक.
सांगोला : पोपट गडदे, भाऊसाहेब खटकाळे, विजय येलपले, सुभाष पाटील, सोमनाथ गोडसे, संतोष देवकते, दादासाहेब बाबर, विजय पवार, संतोष पवार.
उत्तर सोलापूर : दिलीप माने, चंद्रकांत म्हेत्रे, तुकाराम गुंड, सिध्दाराम चाकोते.
दक्षिण सोलापूर : सुरेश हसापुरे, श्रीदीप हसापुरे, नागप्पा बनसोडे, इंदुमती अलगोंडा पाटील.
—
महिला राखीव २ जागा, १७ उमेदवार
सवितादेवी राजेभोसले, इंदुमती अलगोंडा, प्रियांका भगत, मनीषा रणे, माधुरी मोरे, महादेवी कोगनूर, पल्लवी घोडके, भारती भोंग, सविता गायकवाड, रोहिणी मोरे, अश्विनी बादल, सुवर्णा दळवे, सुवर्णा सुरवसे, अर्चना शिंदे, सुनीता खुने, विणा जोकारे, सुप्रिया सुरवसे.
—
अनुसूचित जाती/जमाती 1 जागा , ९ उमेदवार
नानासाहेब नाईकनवरे, नागनाथ रणशूर, लक्ष्मण धनवडे, विशाल जाधव, येदा दुपारगुडे, वैशाली कापुरे, हरिश्चंद्र साळवे, तानाजी गायकवाड, संदीप ठाकरे
—
भटक्या विमुक्त जाती/जमाती 1 जागा, १७ उमेदवार
दादासाहेब शिंगाडे, महेंद्र खटके, पोपट गडदे, नागप्पा बनसोडे, हनुमंत पाटील, प्रथमेश पाटील, सतीश सोनटकले, भाग्यवंत तरंगे, मोतीलाल राठोड, तानाजी वाघमोडे, हणमंत मासाळ, संतोष देवकते, अशोक येडगे, बिरमल कोळी, हणमंतराव बुरले, बनसिध्द बन्ने, भाऊसाहेब बुधवंत.
—
इतर मागासवर्गीय 1 जागा, १९ उमेदवार
देवीदास ढोपे, सिध्देश्वर आवताडे, वैभव कुटे, गोपाळ शेळके, शिवानंद पाटील, यशवंत धोंगडे, विजयकुमार माळी, जमीर सुतार, काशीनाथ गौडगुंडे, महेश सगरे, सुजित बागल, सुभाष गुळवे, रामचंद्र बनकर, नागनाथ झुंजारे, विनोद माने, अविनाश मार्तंडे, श्रीदीप हसापुरे, सुरेश हसापुरे, बबन मेहेर.




















