सोलापूर – कार्तिकी एकादशी वारी २०२६ दरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेद्वारे आदिलाबाद आणि पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.
आदिलाबाद-पंढरपूर दरम्यान ४ फेऱ्या होतील यामध्ये गाडी क्र. ०७६२५ विशेष गाडी आदिलाबाद येथून १९.११.२०२६ आणि २३.११.२०२६ रोजी सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२:३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर गाडी क्र. ०७६२६ विशेष गाडी पंढरपूर येथून २०.११.२०२६ आणि २४.११.२०२६ रोजी रात्री ०८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:०० वाजता आदिलाबादला पोहोचेल.
किनवट, बोधडी (बु), सहस्त्रकुंड, हिमायतनगर, हदगाव रोड, भोकर, मुदखेड, हुजूर साहेब नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब असे या रेल्वे गाड्यांचे थांबे असतील तर २ एसी चेअर कार, २० सेकंड सिटिंग (सामान्य श्रेणी) आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन एकूण २४ डबे अशी रचना असेल.




















