जालना – आज काल अशी फॅशन आली आहे की, एखाद्या महापुुुरुषाची जयंती आली की, नको- नको ते चेहरे आपल्या समोर येऊन उभे राहतात. मात्र पंकज बागल यांनी स्वत: संपूर्ण खर्च करुन यंदा शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम घेऊन एक अभिनव असा उपक्रम पंकज बागल यांनी राबविला आहे.ना राजकारणी मंडळींकडून देणगीच्या नावाखाली पैसे घेतले ना व्यापार्ीलि उद्योजकाकडून वसूल केले, तरीही त्यांनी शिवजयंती हा उत्सव उत्साहात पार पाडला.
शिव जयंतीनिमित्त पंकज बागल यांनी प्रारंभी महाराष्ट्रातील ख्यातनाम शिव व्याख्याते रामजी गाडे यांचा कार्यक्रम तर नंतर शिव गीतकार रविंद्र कोकणे यांच्या शिव गितांचा कार्यक्रम पार पडला. अंबड चौफुली परिसरात झालेल्या या कार्यक्रमास जालना महानगर पालिकेच्या प्रथम महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह पंकज बागल यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी पंकज बागल यांच्यासह समितीचे उपाध्यक्ष सातफुले आणि राज कबाळे यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमासाठी शहर आणि परिसरातील नागरीकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर वदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत तसेच शिव जयंती समितीचे पंकज बागल यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
————————————————————————-
फोटो कॅप्शन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि पंकज बागल आदी मान्यवर दिसत आहेत. (छाया: गौतम वाघमारे)



















