कुर्डुवाडी – शहर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी अशा मोठ्या हाॅस्पीटलची गरज होती ती गरज आज डाॅ.बोबडे यांच्या मल्टिस्टेट हाॅस्पीटलने भरून काढली आहे. यामध्ये सर्व सुविधा या एका छताखाली देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शल्यचिकित्साही याठिकाणी करता येणार आहे. यामुळे शहर परिसरातील नागरिकांची ऐनवेळी वैद्यकीय सेवेसाठी होणारी धावपळ आता दूर होणार आहे असे प्रतिपादन मा.आ.संजयमामा शिंदे यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
कुर्डुवाडी येथे डाॅ.बोबडे यांचे ‘ ‘बोबडे मल्टिस्पेशालिटी हाॅस्पीटल’ चा उद्घाटन समारंभ माढा- करमाळा विधानसभा मतदार संघाचे मा.आ.संजयमामा शिंदे, डाॅ. बी वाय यादव(शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ख्यातनाम सर्जन ), डाॅ.नितीन बस्ते (प्राचार्य. विभाग प्रमुख शल्यचिकित्सालय शास्त्र एस एम बी टी मेडिकल काॅलेज धामनगाव ) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहत पार पडले.
प्रास्ताविकात डाॅ.रवींद्र बोबडे यांनी जमलेल्या नागरिकांचे आभार व्यक्त करताना आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मी आजपर्यंत आपली सेवा करु शकलो अशी संधी यापुढेही माझ्यासह डाॅ. शुभम बोबडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना माफक दरात सेवा करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
याबरोबर डाॅ.सोनाल बोबडे- बोरुडे व प्रा.डाॅ.राजेंद्र दास,डाॅ.विलास मेहता, सय्यद मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डाॅ.रवींद्र बोबडे,सुहासिनी बोबडे,डाॅ.शुभंम बोबडे,डाॅ.श्रुतिका बोबडे,सोनल बोरुडे- सारंग बोरुडे, डाॅ.यज्ञेश केडीयुरु,डाॅ.रूपेश मंगवडे, डाॅ.स्नेहल मंगवडे व सुप्रिया गवळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा जयश्री भिसे, उपनगराध्यक्षा सविता जगताप, ग्रामीण रुगणालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुनंदा रणदिवे ,डाॅ.सुरेंद्र भुयार, डाॅ.स्नेहा भुयार, आयएमए चे राज्याध्यक्ष डाॅ.संतोष कुलकर्णी,माजी आ. विनायक पाटील,डाॅ.दिनेश कदम ,प्रा.डाॅ.राजेंद्र दास, , शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, समिर मुलाणी यांच्यासह शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक शहर व परिसरातील नामवंत डाॅक्टर व पॅरामेडिकल स्टाफ,प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

























