पंढरपूर – तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिमित्त शिवशंभो प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात तब्बल ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.
या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, सरपंच व शिवशंभो प्रतिष्ठानचे कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. सरजूबाई बजाज रक्तपेढी पंढरपूर यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
























