धाराशिव – येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पती विभागाच्या वतीने आयोजित ‘ऍडव्हान्समेंट इन बायोलॉजिकल रिसर्च’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन संस्थेच्या मार्गदर्शिका रेखाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर प्रा.डॉ. वरप्रसाद राव, प्रा.डॉ. उत्तम साळवे, शैलेश कुलकर्णी, प्रा.डॉ. अविनाश आडे,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. प्रशांत चौधरी, विभागप्रमुख प्रा.अनिता लिंगे ,प्रा.अभय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या आर्थिक सहयोगाने हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत वाढत्या प्लास्टिक समस्येवर संशोधनातून कशाप्रकारे उपाय केले जाऊ शकतात, तसेच वनस्पती ओळखण्यासाठी नवीन ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो यासह विविध विषयावर विचार व्यक्त करण्यात आले.
या परिषदेसाठी साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. अविनाश आडे, प्रा.डॉ. वरप्रसाद राव, प्रा.डॉ. उद्धव भाले, प्रा.डॉ.जितेंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते. त्यांनी विविध विषयावर या परिषदेमध्ये विचार व्यक्त केले. या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयावर तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले.
या परिषदेचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. प्रशांत चौधरी यांनी या परिषदेच्या आयोजनामागील महाविद्यालयाची भूमिका विषद केली. तसेच उद्घाटनपर बोलताना श्रीमती रेखाताई महाजन यांनी या परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.
या परिषदेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुहास पाटील,प्रा.डॉ.मिलिंद माने यांनी केले तर आभार प्रा.अभय शिंदे यांनी मानले. या परिषदेमध्ये प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. प्रशांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अनिता लिंगे, प्रा.अभय शिंदे प्रा. डॉ. रोहिणी यावलकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.























