सोलापूर : सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील खेळाडूंनी नू. म. वि. प्रशालेत सोलापूर जिल्हा योग परिषद व योगसाधना मंडळ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय व महाविद्यालयीन सांघिक सूर्यनमस्कार, योगासन क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेत राजेश्वरी नूला, कोमल म्हात्रे, श्राविका म्हैसकर, सलोनी उबाळे, श्रुती वाघमारे, प्रज्ञा दिवेकर, प्रतिमा साखरे, प्रेरणा सुरवसे, सलोनी कुरापटी, गायत्री टिकुटे, प्रतीक्षा नागटिळक आदी खेळाडूंनी सहभाग घेतला.
या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. भक्तराज जाधव, अशोक विंचूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ: यशस्वी खेळाडूंसोबत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. भक्तराज जाधव, डॉ. नागोराव भुरके आदी






















