अक्कलकोट – येथील शहरातील श्री अक्कमहादेवी मंदिरासमोरील नवीन सभामंडपाच्या बांधकामाचे भूमीपूजन तालुक्याचे आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठया थाटात पार पडले.
मंदिर परिसराच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा असून, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातुन शासनाच्या माध्यमातून सुमारे ५१ लाख रुपये या सभामंडप उभारण्यासाठी देण्यात येणार आहे. हे सभामंडप उभारल्यानंतर मंदिरात येणाऱ्या भाविकांना धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन व सामाजिक उपक्रमांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. अक्कलकोट शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला बळ देणारा हा उपक्रम ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
या पवित्र सोहळ्यास म.नि प्र. बसवलिंग महास्वामीजी, भाजपचे जेष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, दूधनी मार्केट कमिटी सभापती अप्पु परमशेट्टी, श्रीशैल भरमशेट्टी, चंद्रकांत स्वामी, नगरसेवक अविनाश मडीखांबे, शशिकांत बकरे, महेश हिडोळे, देविदास कविटगी, विक्रम शिंदे, अपर्णाताई सिद्धे, अशोक जाधव, अंकुश चौगुले, सद्दाम शेरीकर, लक्ष्मण समाणे, रवी बकापुरे, राजकुमार कांदे, मल्लिनाथ येरेगुंटे, मंतेश अडवीतोटे, शिवशंकर चनशेट्टी, सुभाष आंदोडगी, मल्लिनाथ माळी, श्री रेणुकाचार्य अक्कलबळग भजनी मंडळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























