सोलापूर – गुन्हे करणारे टोळी सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आली आहे. असे आदेश सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून दी.२० फेब्रुवारी रोजी काढण्यात आले.
यामध्ये अयान उर्फ वडा सैफन मुच्छाले, वय-२० वर्षे, रा. २७०, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर (टोळी प्रमुख) आसिफ महमद हुसेन बडेपीर, वय-१९ वर्षे, रा. मुस्लिम पाच्छापेठ, इक्बाल फॅशन जवळ, सोलापूर याचेविरुध्द सन २०२५ या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून मोटार सायकल चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश ने दि.१३/०२/२०२६ अन्वये, टोळीतील अयान उर्फ वडा सैफन मुच्छाले, वय-२० वर्षे, रा. २७०, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर (टोळी प्रमुख) आसिफ महमद हुसेन बडेपीर, वय-१९ वर्षे, रा. मुस्लिम पाच्छापेठ, इक्बाल फॅशन जवळ, सोलापूर यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.



















