सांगोला – विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान जेवढे उपयुक्त आहे त्याचप्रमाणे तो सर्वगुणसंपन्न व्हावा असे वाटत असेल तर त्यांच्या कलागुणांना ही वाव मिळाला पाहिजे असे प्रतिपादन प्रा.प्रशांत धनवे यांनी केले. ते सांगोला महाविद्यालय येथे वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित कॉमर्स कार्निवल २०२५-२६ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन प्रा.प्रशांत धनवे, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ.राम पवार, पी.पी.टी.प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन संस्था सदस्य सुरेश फुले यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.सदाशिव देवकर, प्रा.सुरेखा गायकवाड, प्रा.डॉ.ओंकार घाडगे, प्रा.डॉ.जमीर तांबोळी, डॉ.मालोजी जगताप, विद्या पाटणे यांनी केले. सुरेश फुले यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्पर्धा कश्या उपयुक्त आहे ते सांगितले.
संस्था सहसचिव साहेबराव ढेकळे व डॉ.सुरेश भोसले यांनी वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गेले चार वर्षे स्पर्धा घेत असल्याबद्दल त्या विभागाचे कौतुक केले. यावेळी सृष्टी खंडागळे, वैष्णवी मोरे, मयुरी सावंत, जीवन व्हनमाने, योगीराज थोरबोले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी सुर्यागण, प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.विद्या जाधव यांनी केले. आभार सिमा मिसाळ यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक विलास माने, प्रा.समाधान माने, प्रा.सचिन सुरवसे, प्रा.प्राप्ती लामगुंडे, प्रा.निकिता लामगुंडे यांचे सहकार्य लाभले.

























