सोलापूर – दि.२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ज्ञान प्रबोधिनी सोलापूर बालविकास मंदिर शिशुशाळेत वय वर्षे ५ ते ६ वयोगटातील विद्यार्थी गेली १५ वर्षे पालक व शिक्षिकांच्या मदतीने विज्ञान प्रदर्शन मांडणी करतात.
दर वर्षी वेगवेगळ्या गटांपर्यंत विज्ञान प्रयोग प्रदर्शन मांडणी पोहचवत आहोत.या वर्षीही *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६* या दिवशी ज्ञान प्रबोधिनी – सोलापूर बालविकास मंदिर येथे स.१० ते १२ या वेळेत विज्ञान प्रदर्शन भरणार आहे. हवेचा दाब, हवेला जागा लागते, डांबर गोळीचा नाच, मेणबत्तीचा सी- सॉ, जादूचा डबा, मिठाच्या पाण्यात रंग मिसळत नाही इत्यादी सोप्या सोप्या प्रयोगांची मांडणी करून मुले प्रत्यक्ष माहिती सांगणार आहेत.आपण सर्वांनी प्रदर्शन पाहण्याचा अवश्य अनुभव घ्यावा.
मागील वर्षी पालकांच्या व शिक्षकांच्या मदतीने ८० वैज्ञानिक प्रयोगांची स्वतः मांडणी केली होती.
बालशाळेत मुलांना त्यांच्या नैसर्गिक कुतूहलाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, या वयोगटातील मुलांना सोपे सोपे प्रयोग करण्याची संधी देऊन
मुलांमधील निरीक्षणाची नैसर्गिक शक्ती जागृत करण्यासाठी,जिज्ञासू वृत्ती वाढवण्यासाठी ह्या उपक्रमाची योजना केली होती.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे, पालक गट, इयत्ता १ली ते ४थी प्राथमिक विद्यार्थी, सोलापूर शहरातील विविध शाळांमधील शिशु-शिक्षिका व छात्र-अध्यापिका इत्यादी ५०० जणांनी विज्ञान प्रयोग प्रदर्शनाच्या मांडणीचा लाभ घेतला होता.
ज्ञान प्रबोधिनी ,बाल विकास मंदिर – सोलापूर























