Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे व्हा!

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचा दृष्टिकोन आवश्यक आहे, या विचारातून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,्सं्सं   संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी या महाविद्यालयामध्ये एक आठवड्याच्या उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण उद्घाटन दि. २३ 

 फेब्रुवारी  रोजी संपन्न झाले. २३ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये “नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना” हा आत्मविश्वास जागवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न महाविद्यालयामार्फत करण्यात येत आहे.

उद्घाटनप्रसंगी बार्शीतील नामवंत उद्योगपती  गौतम कांकरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे होते. व्यासपीठावर उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के.बी.चपटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा एम. ए. ढगे, प्रा. एन. आर. सरफळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रेरणादायी वातावरणात करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. बी. डी. लांडे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शिकून फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”

प्रमुख पाहुणे गौतम कांकरिया यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील वास्तव चित्र समजावून सांगितले. “व्यवसाय म्हणजे फक्त नफा नाही; तो धैर्य, सातत्य आणि अपयशाला सामोरे जाण्याची तयारी आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ ही वृत्ती व्यवसायात चालत नाही; परिस्थितीनुसार लवचिकता ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यासच यश प्राप्त होते,” असे सांगत त्यांनी स्वतःच्या संघर्षमय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने शेअर केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासणे गरजेचे आहे. या व्याख्यानमालेतून मिळणारे मार्गदर्शन तुमच्या भविष्यास दिशा देणारे ठरेल.” त्यांनी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या सर्व सत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा, असे आवर्जून सांगितले.

या  कार्यक्रमामध्ये सॉफ्ट स्किल्स, ताण-तणाव व्यवस्थापन, व्यवसाय कायदे, करप्रणाली, उद्योजकतेतील संधी व आव्हाने इ. विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक सत्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वाशी जोडणारे आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारे ठरणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम. भाग २ मधील विद्यार्थीनी शिवानी पवार हिने केले, प्रमुख पाहुण्यांची ओळख बी. कॉम. भाग – 3 चा विद्यार्थी यश रणसुभे याने करुन दिली तर प्रा.  एन. आर. सारफळे यांनी आभार मानले.

Post Views: 40
Previous Post

25 बेपत्ता तरुणी शोधण्यात पोलीसांना यश; पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांच्या कौशल्यपूर्ण तपास

Next Post

आपत्‍कालीन परिस्थितीला कनखर मनोधैर्याने सामोरे जावे -डॉ. वडजे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आपत्‍कालीन परिस्थितीला कनखर मनोधैर्याने सामोरे जावे -डॉ. वडजे

ताज्या बातम्या

आपातकालीन स्थितीत मंडळस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

June 10, 2026

बायोमेट्रिक हजेरीसह कडक अमंलबजावणी आवश्यक

June 10, 2026
कमलादेवी मंदिर परिसरात ‘रील्स’ व फोटोग्राफीवर बंदी; नियम मोडल्यास थेट FIR आणि मोबाईल जप्त होणार

कमलादेवी मंदिर परिसरात ‘रील्स’ व फोटोग्राफीवर बंदी; नियम मोडल्यास थेट FIR आणि मोबाईल जप्त होणार

June 10, 2026

पाझर तलावावर महसूल विभागाचा ‘बुलडोझर’; सौंदरेतील अवैध मुरूम उत्खनन उधळले, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 10, 2026

विद्यार्थ्यांनी विकसित केली एअर-कूल्ड ईव्ही बॅटरी एनक्लोजर प्रणाली

June 10, 2026
अनेक दिवसापासून साचलेला कचरा काढण्याची मागणी

अनेक दिवसापासून साचलेला कचरा काढण्याची मागणी

June 10, 2026

 मोडनिंब ग्रामपंचायतीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

June 10, 2026
कोणार्क, एल टी टी एक्सप्रेसला कुर्डूवाडी थांबा मंजूर करा

कोणार्क, एल टी टी एक्सप्रेसला कुर्डूवाडी थांबा मंजूर करा

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902657

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697